कोकाटेंची कृषीमंत्रीपदाची जबाबदारी काढली जाणार?
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दलचा निर्णय जवळपास झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दलचा निर्णय जवळपास झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांच्यात दिल्लीत चर्चा झाली आहे. कोकाटे यांचं खातं काढलं जाणार आहे. खात्यांमध्ये फेरबदल होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे रमी प्रकरण कोकाटे यांना चांगलंच भोवण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्ये आणि विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने महायुतीतील मंत्री माणिकराव कोकाटे राज्यभर चर्चेचा विषय बनले आहेत. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र केली असून, राज्यात ठिकठिकाणी कोकाटे यांच्याविरोधात रस्त्यावर आंदोलनेही झाली आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना आता त्यांचे मंत्रीपदाचे खाते बदलले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
