Video : शिंदे गटाचा उठाव नसून कट आहे- मनिषा कायंदे
शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी भाजप आणि शिंदे गटाला काही प्रश्न विचारले आहेत. एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) नक्की मुख्यमंत्री आहेत का? की नावालाच मुख्यमंत्री आहेत? जर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर मग भाजपच्या दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला फक्त देवेंद्र फडणवीसच कसे? असा सवाल करत मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे गटाला डिवचले आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना […]
शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी भाजप आणि शिंदे गटाला काही प्रश्न विचारले आहेत. एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) नक्की मुख्यमंत्री आहेत का? की नावालाच मुख्यमंत्री आहेत? जर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर मग भाजपच्या दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला फक्त देवेंद्र फडणवीसच कसे? असा सवाल करत मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे गटाला डिवचले आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना छोट्याछोट्या गोष्टींसाठी दिल्लीसमोर मान झुकवावी लागते. वारंवार दिल्लीत जावं लागतं. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असल्याचं भाजपचे नेते सांगत आहेत. त्यामुळे भाजप-शिंदे गटात नेमकं काय चाललंय हे दिसून येतंय, असा टोलाही कायंदे यांनी लगावला आहे.
Published on: Jul 25, 2022 12:57 PM
