Manoj jarange Patil : अजितदादांनी साप पाळलेत, जरांगेंचा हल्लाबोल, राष्ट्रवादीवर काय केलं मोठं वक्तव्य?

Manoj jarange Patil : अजितदादांनी साप पाळलेत, जरांगेंचा हल्लाबोल, राष्ट्रवादीवर काय केलं मोठं वक्तव्य?

| Updated on: Oct 08, 2025 | 2:08 PM

मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल करत, त्यांनी मराठ्यांविरोधात साप पाळले असल्याचा आरोप केला आहे. अजित पवारांच्या पक्षाचे नेते मराठ्यांच्या विरोधात काम करत असून, हे मराठा आरक्षणाविरोधातील मोठे षडयंत्र असल्याचा दावा जरांगेंनी केला आहे. त्यांनी भुजबळांनाही भविष्यात वाईट दिवस येतील, असा इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजितदादांनी साप पाळलेत अशा तीव्र शब्दांत जरांगेंनी हल्लाबोल करत, अजित पवारांच्या पक्षाचे नेते मराठा समाजाच्या विरोधात काम करत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, हे मराठ्यांविरोधात रचलेले मोठे षडयंत्र आहे.

तर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर निशाणा साधत, त्यांना खूप वाईट दिवस येणार असल्याचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांनी विरोधकांना बावळट आणि पिसाळलेल्या कुत्र्यासारखे असे संबोधले आहे. मराठा समाजाला शत्रू समजून, इतर जातींना खोटी आश्वासने देऊन व मोठेपण देऊन मराठ्यांच्या विरोधात भानगडी केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अजित पवारांच्या पक्षातील अनेक नेते मराठ्यांविरोधात सक्रिय असल्याचे जरांगेंनी म्हटले आहे. बीडमध्ये काढला जाणारा मोर्चा हा अजित पवार पुरस्कृत असून, तो मराठ्यांविरोधातील षडयंत्राचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. अजित पवारांनी साप पोसले आहेत आणि एक दिवस त्यांना या गोष्टीचा पश्चाताप होईल, असा गंभीर इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Published on: Oct 08, 2025 02:08 PM