Jarange Patil Video : ‘छगन भुजबळ सडलेल्या डोक्याचा, तो स्वप्न बघून मरेल पण…’, मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा डिवचलं

Jarange Patil Video : ‘छगन भुजबळ सडलेल्या डोक्याचा, तो स्वप्न बघून मरेल पण…’, मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा डिवचलं

| Updated on: Mar 08, 2025 | 4:21 PM

जालन्यातील अनवा गावात एका तरूणाला तप्त सळईचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आला. यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा राजकीय नेत्याच्या प्रतिक्रिया समोर येत असतना संताप अनावर झाला.

जालन्यातील कैलास बोराडे याच्या व्हायरल व्हिडीओ संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य करताना छगन भुजबळांवर चांगलाच हल्लाबोल केला. व्हिडिओ संदर्भात कारवाई केली का ? पालकमंत्र्यांनी याची काही माहिती घेतली का ? धर्म,देव आणि महापुरुष यापलीकडे गढूळ व्यक्तींना जातीवादाचं वेड लागले आहे.सरकारकडून पडताळणी झाल्यावर मी नाव घेईल, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले तर पुढे ते असेही म्हणाले, काही गढूळ व्यक्तींना जातीयवादाचा नाद लागलाय. धर्म, देव आणि महापुरूषांपेक्षा काही लोकांना त्यांची जात मोठी वाटतेय. हे जालन्यातील घटनेवरून सिद्ध होणार असल्याचे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिलं. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. छगन भुजबळ हा सडलेल्या डोक्याचा आहे. यांच्या डोक्यात फक्त जातीभेद आहे. पूर्वीच्या काळी सगळे मिळून चुकणाऱ्यांचे कान पकडायचे. गुन्हे करणारा तो आपला बाब्या आणि तोच चांगला असे सध्या सुरु आहे. छगन भुजबळ यांचे जातीवादीचे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. छगन भुजबळ याना धनगर, ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावायचे आहेत. मात्र स्वप्न बघून मरशील पण स्वप्न पूर्ण होणार नाही, अशी जहरी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

Published on: Mar 08, 2025 04:21 PM