Manoj Jarange : फडणवीस घरी येऊन चहा प्यायले, मग पक्ष बरबाद झाला तरी… मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर खोचक टीका

Manoj Jarange : फडणवीस घरी येऊन चहा प्यायले, मग पक्ष बरबाद झाला तरी… मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर खोचक टीका

| Updated on: Aug 31, 2025 | 3:43 PM

मनोज जरांगे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या विधानावर टीका केली. फडणवीस राज ठाकरेंच्या घरी चहा पिऊन गेला तरी मग पक्ष बरबाद झाला तरी चालतं, असं एकेरी भाष्य करत जरांगेंनी हल्लाबोल केलाय.

मराठा आरक्षणासंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तर एकनाथ शिंदेंच देऊ शकतील. जरांगे परत का आले याचं उत्तर तेच देऊ शकतील.. असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य केले होते. मागच्यावेळी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे येत असताना एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन प्रश्न सोडवलेला ना, मग हे परत का आले? असा सवालही राज ठाकरे यांनी केला होता. यावरूनच मनोज जरांगे पाटील यांनी खोचक पलटवार केलाय. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना कुचक्या कानाचे आणि मानाला भुकेलेलं पोरंग असल्याचे म्हणत जिव्हारी लागणारी टीका केली आहे.

ठाकरेंचे दोघे भाऊ चांगले. ब्रँड चांगला आहे. हा विनाकारण मराठ्यांच्या मध्ये पडतो. ११ ते १३ आमदार निवडून दिले. ते पळून गेले. आम्ही विचारलं का. फडणवीसांनी लोकसभेला तुझा गेम केला. विधानसभेला तुझ्या मुलाला त्यांनीच पाडलं. तरी आम्ही विचारलं का. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकलेलं पोरगं. फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेला तरी मग पक्ष बरबाद झाला तरी चालतं. हुरळून जातात, असा हल्लाबोल जरांगेंनी केला.

Published on: Aug 31, 2025 03:43 PM