आंदोलक आक्रमक! स्वच्छतेसाठी आलेल्या गाड्या अडवल्या, मुंबईच्या स्वच्छतेवर परिणाम
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे उपोषण आता चौथ्या दिवशी आहे. हजारो मराठा समाजातील लोक मुंबईत आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झाले आहेत. आंदोलकांनी बीएमसीच्या स्वच्छता गाड्या अडवल्या आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. आज, 1 सप्टेंबर 2025 रोजी, त्यांच्या आंदोलनाचा आणि उपोषणाचा चौथा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून आझाद मैदान, बीएमसी परिसर आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे, ज्यामुळे या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तर आता आज आंदोलकांनी स्वच्छतेसाठी आलेल्या बीएमसीच्या गाड्या देखील अडवल्या आहेत. त्यामुळे याचा परिणाम स्वच्छतेवर होत असल्याचं बीएमसीने म्हंटलं आहे. मुंबईच्या फॅशन स्ट्रीट परिसरात आंदोलकांनी पालिकेच्या साफसफाईच्या या गाड्या अडवून धरलेल्या आहेत. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे.
Published on: Sep 01, 2025 11:14 AM
