Manoj Jarange Patil : शहाणपणा करायचा नाही, मागचं पुढचं सगळं काढेन… मराठा आरक्षणावरून जरांगेंचा मुंडेंना थेट इशारा
धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केल्याने मनोज जरांगे पाटील चांगलेच भडकले आहेत. त्यांनी मुंडेंना रक्तानं हात भरलेत, माझ्या नादी लागू नये असा इशारा दिला, तसेच राजकीय नामोनिशाण मिटवण्याची धमकी दिली.
दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील यांनी मुंडेंना रक्तानं हात भरलेत, माझ्या नादी लागू नये असा इशारा दिला. तसेच, मुंडे बंधू-भगिनींनी मराठा आरक्षणाला विरोध केल्यास त्यांचे राजकीय नामोनिशाण मिटवू, असा दमही भरला आहे.
या प्रकरणी जरांगे पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून उभ्या राहणाऱ्या मराठा उमेदवारांना पाडण्याचा इशारा दिला. तर, तटकरे यांनी अजित पवार हे मराठा आणि ओबीसी हिताचे संरक्षण करणारे शिस्तप्रिय नेते असल्याचे म्हटले. दरम्यान, कुणबी जात प्रमाणपत्रासाठी केवळ आडनावावरून प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरले जाणार नाही, वंशावळ महत्त्वाची आहे, असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
Published on: Oct 03, 2025 10:52 PM
