Manoj Jarange Patil : सरकारवर दबाव वाढला; बच्चू कडूंच्या उपोषणाला मनोज जरांगेंचा जाहीर पाठिंबा

Manoj Jarange Patil : सरकारवर दबाव वाढला; बच्चू कडूंच्या उपोषणाला मनोज जरांगेंचा जाहीर पाठिंबा

| Updated on: Jun 11, 2025 | 4:33 PM

Bachchu Kadu Hunger Strike : उपोषणाला बसलेळे माजी आमदार बच्चू कडू यांची आज मनोज जरांगे यांनी भेट घेतली असून त्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे गेल्या 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कडू या उपोषणाला बसलेले आहेत. आज उपोष्णाच्या चौथ्या दिवशी बच्चू कडू यांची तब्येत खालावलेली असताना देखील प्रशासनाकडून या अन्नत्याग आंदोलनाची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही.

दरम्यान, काल शरद पवार यांनी फोन करून बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील बच्चू कडू यांच्या उपोषण स्थळी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी देखील या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवला असून मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही बच्चू कडूंसाठी रस्त्यावर उतरू असंही जरांगे यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे आता सरकारवरचा दबाव वाढला आहे.

Published on: Jun 11, 2025 04:33 PM