Manoj Jarange Patil : …त्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत ‘चलो मुंबई’चा नारा
मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरताना दिसणार आहे. त्यांनी चलो मुंबईचा नारा दिला आहे.
येत्या 29 ऑगस्ट 2025 ला मुंबईत आंदोलनासाठी जाणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मुंबईत आमरण उपोषण होणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तर मुंबईत गेल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. चलो मुंबई… असा नारा आजपासून मराठा समाजाकडून देण्यात आला असून आता मुंबईत गेल्याशिवाय मराठा समाजाच्या मागण्या सरकार पूर्ण करणार नाहीत, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाकडून सातत्याने उचलून धरलेल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, या मागणीसाठी येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईकडे येणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. इतकंच नाहीतर यावेळी मुंबईत आमरण उपोषण होणार असल्याचा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
Published on: Apr 30, 2025 02:39 PM
