शरद पवार गटाच्या नेत्यांची अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या दिशेने वाटचाल ?

शरद पवार गटाच्या नेत्यांची अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या दिशेने वाटचाल ?

| Updated on: Feb 26, 2025 | 11:18 AM

महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते हे सध्या अजिच पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाल्यानंतर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील इनकमिंगला उधाण आलं आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते हे सध्या अजिच पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.कारण राहुल मोटे, राहुल जगताप, विजय भांबळे हे शरद पवारांची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेले धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा येथून राहुल मोटे, तसेच अहिल्याबाई नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभेतील अपक्ष उमेदवार राहुल जगताप , आणि परभणी मधील सेलू जिंतूर येथील विजय भांबळे हे शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याचे वृत्त आहे. पण विधानसभा निवडणुकीत ज्यांनी महायुतीविरोधात निवडणूक लढली, त्यांनाच अजित पवार आता पक्षात स्थान देणार का ? याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे.

Published on: Feb 26, 2025 11:18 AM