Dharashiv : मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO

Dharashiv : मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO

| Updated on: Jul 19, 2025 | 6:14 PM

धाराशिव येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव घातला.

धाराशिव येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव घालत कुणबी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात जाणीवपूर्वक अडवणूक होत असल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी मराठा कार्यकर्ते आणि सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. संतप्त सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्याला फोनवरून खडसावत पुरावे सादर करणाऱ्या व्यक्तींना तातडीने कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. यापूर्वी दोनदा आदेश देऊनही काम न झाल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्याला कडक शब्दांत सुनावले.

आज रोजी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरनाईक यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. यावेळी सरनाईक यांनी मराठा कार्यकर्त्यांसमोरच जात वैधता समितीच्या अधिकाऱ्याशी फोनवर संपर्क साधून त्यांना जाब विचारला आणि त्वरित कारवाईचे निर्देश दिले. या घटनेमुळे मराठा समाज आणि प्रशासन यांच्यातील तणाव पुन्हा चर्चेत आला आहे.

Published on: Jul 19, 2025 06:14 PM