सरकारला दिलेलं अल्टिमेटम संपण्यापूर्वी बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा, कशी असणार सभेची तयारी?

सरकारला दिलेलं अल्टिमेटम संपण्यापूर्वी बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा, कशी असणार सभेची तयारी?

| Updated on: Dec 22, 2023 | 11:45 PM

मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम रविवारी संपणार आहे. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये उद्या शेवटची जंगी इशारा सभा होणार आहे. तर या उद्याच्या सभेत जरांगे पाटील आंदोलनाची कोणती पुढील दिशा ठरवणार

मुंबई, २२ डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम रविवारी संपणार आहे. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये उद्या शेवटची जंगी इशारा सभा होणार आहे. तर या उद्याच्या सभेत जरांगे पाटील आंदोलनाची कोणती पुढील दिशा ठरवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. इतकंच नाही तर सभेतून कोणावर हल्लाबोल करणार हेही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. जरांगे पाटील यांच्या या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. बीडमध्ये कुठलाही तणाव नाही. उद्याची सभा शांततेत होईल. त्यासाठी आज आम्ही पोलीस रूट मार्च घेतला आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही सीसीटिव्ही लावले आहेत. त्यावरून आमचं लक्ष राहणार आहे, असं पोलिस प्रशासनाने सांगितलंय. तर दोन अपर पोलीस अधीक्षक आणि 55 अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. साधारणतः पोलीस आणि होमगार्ड असे 1800 कर्मचारी तैनात आहेत. उद्या सकाळी आठ वाजल्यापासून प्रमुख रस्ते बंद होतील. अत्यावश्यक सेवा वाहतूक सुरू राहणार असून या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क आहे.

Published on: Dec 22, 2023 11:45 PM