Chhagan Bhujbal यांचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला; म्हणाले, मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा…

Chhagan Bhujbal यांचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला; म्हणाले, मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा…

| Updated on: Oct 02, 2023 | 4:12 PM

VIDEO | मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे, 'मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माझा विरोध नाहीच तर मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा सगळ्यांना बोला नाहीतर त्याला राजकीय वास येईल'

मुंबई, २ ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील हे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. छगन भुजबळ यांना बळ द्यायचं काम मराठा समाजाने करू नये, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोली येथे केलं होतं. जरांगे पाटील यांनी केलेल्या त्या वक्तव्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना सल्ला दिला आहे. ‘मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा सगळ्यांना बोला. नाही तर त्याला राजकीय वास येईल’, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते पुढे असेही म्हणाले की, आधीच ओबीसी समाजाला आरक्षण खूप कमी आहे. त्यामुळे मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या आणि हे मत माझ्या एकट्याचे नाही तर इतर अनेक नेत्यांचे हेच मत आहे. त्यामुळे इतरांचे नाव घेऊन जरांगे का बोलत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Published on: Oct 02, 2023 04:12 PM