तर मी त्याचा बाजार उठवतो! मनोज जरांगेंचं इशारा सभेतून मोठं विधान

तर मी त्याचा बाजार उठवतो! मनोज जरांगेंचं इशारा सभेतून मोठं विधान

| Updated on: Aug 24, 2025 | 4:31 PM

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांनी बीड येथे झालेल्या सभेत फडणवीस सरकारवर निशाणा साधला आणि आरक्षणासाठीचा हा शेवटचा संघर्ष असल्याचे स्पष्ट केले.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी मराठा समाजाला सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. तत्पूर्वी आज त्यांनी बीडच्या मंजरसुंबा येथे इशारा बैठक तथा सभेचे आयोजन केलेल होते. यावेळी या सभेतून मराठा समाजासमोर बोलताना जरांगे यांनी थेट फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे तसंच आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा देखील दिला आहे.

यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे. मुंबईला येण्याची हौस नाही. पण लेकरंबाळांसाठी यावं लागतंय. 29 ऑगस्टला मुंबईला जायचं आहे. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आंतरवलीतून मुंबईला निघायचं. समाजाला डाग लागेल असं पाऊल उचलायचं नाही. कुणी दगडफेक आणि जाळपोळ करायची नाही”, असं आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, तुम्ही गर्व वाटावं असं काम करत आहेत. बीडचं हे नुसतं रुप बघून सरकारला रातभर झोप राहणार नाही. बेजार होणार. चलो मुंबई. 29 ऑगस्टला जमून फाईटच आहे. मला म्हणतात, तुला हाणीन. मी म्हटलं, मला? अरे तुम्ही आई-बहिणींचं रक्त साडलं आहे, माझ्या माय-बहिणी रक्ताच्या थारोळ्यात टाकल्या. यावेळी तु्म्ही पोरांना डिवचून दाखवा. काय मराठ्यांची अवलाद आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो, असा थेट इशाराच त्यांनी फडणवीस सरकारला दिला आहे.

Published on: Aug 24, 2025 04:31 PM