‘माझ्या हातात असतं तर…’; देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी व्यक्त केल्या भावना

‘माझ्या हातात असतं तर…’; देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी व्यक्त केल्या भावना

| Updated on: Apr 01, 2025 | 3:58 PM

अभिनेता सायाजी शिंदे यांनी आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची मस्साजोग येथे जाऊन सांत्वनपर भेट घेतली आहे. यावेळी धनंजय देशमुख यांच्याशी त्यांनी चर्चा देखील केली.

बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची 3 महिन्यांपूर्वी निर्घृण हत्या झाली. त्यानंतर संपूर्ण राज्य हादरून निघालं. सगळ्याच क्षेत्रातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. सध्या या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू आहे. अशातच आज मराठी अभिनेता सायाजी शिंदे यांनी देखील मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आहे.

यावेळी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगा विराज देशमुख उपस्थित होते. या भेटीनंतर सायाजी शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपण सगळ्यांनी या काळात संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबत राहिलं पाहिजे. त्यांचा आत्मा अजरामर कसा होईल हे पाहायला हवं. माझ्या हातात असतं तर या प्रकरणाचा निकाल मी ताबडतोब लावला असता. पण आता जे निर्णय घेणारे आहेत त्यांनी या प्रकरणावर लवकर निकाल दिला पाहिजे. आपण पुन्हा पुन्हा त्या फोटो आणि व्हिडिओचा उल्लेख देशमुख कुटुंबासमोर करणं म्हणजे संतोष देशमुख यांना पुन्हा तितक्या वेळा मारण्यासारख आहे. त्यामुळे आता आपण फक्त त्यांना न्याय मिळाला पाहिजे या गोष्टीवर भर दिला पाहिजे, असं सायजि शिंदे यांनी म्हंटलं.

Published on: Apr 01, 2025 03:58 PM