Hingoli | बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

Hingoli | बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

| Updated on: Apr 09, 2026 | 4:09 PM

बदलत्या हवामानाचा फटका झेंडू फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून मोठे आर्थिक नुकसान होत आहे. लग्नसराईच्या हंगामाचा विचार करून हिंगोलीतील शेतकऱ्यांनी तीन महिने आधी झेंडूची लागवड केली होती. प्रति एकर सुमारे 41 हजार रुपये खर्च करून शेती उभी केली होती.

मात्र अचानक बदललेल्या वातावरणामुळे पिकांवर किटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. झेंडूची फुले काळी पडत असून त्यांची गुणवत्ता घसरली आहे. त्यामुळे बाजारात योग्य दर मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन विक्रीयोग्य राहिलेले नाही.

या परिस्थितीत प्रति एकर जवळपास 50 हजार रुपयांचे नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी देखील केली जात आहे.

Published on: Apr 09, 2026 4:09 PM
Follow Us