Task Force Meeting | टास्क फोर्सच्या बैठकीत मास्क सक्तीचा निर्णय नाही

| Updated on: Jun 02, 2022 | 10:01 PM

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, यावर भर दिला पाहिजे.

Follow us on

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Patients) संख्या वाढते आहे, राज्य सरकार पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क (Masks) वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज येथे केले. मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. तसेच वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे राज्यातील गर्दीच्या ठिकाणी मास्कची सक्ती होऊ शकते असा तर्क लावला जात होता. मात्र सध्यातरी कोरोनाचे असे कोणतेच सक्तीचे नियम लादण्यात आलेले नाहीत. वर्षा निवासस्थानी असलेल्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते.