Sanjay Shirsat | कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल

Sanjay Shirsat | कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल

| Updated on: Jan 21, 2026 | 5:57 PM

कोण कोणाच्या संपर्कात आहे, याचं कोडं आत्ता सांगणं कठीण आहे. परंतु KDMC मध्ये महायुतीची सत्ता नक्की येईल, आणि शिवसेनेचा महापौर नक्की बसेल असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.

राज्यभरात महापालिका निवडणुका होऊन निकालही लागला, मात्र मुंबईसह सगळीकडे महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये महायुतीने एकत्र निवडणूक लढली होती. भाजप आणि शिवसेनेमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. मात्र महापौर नक्की कोणाचा? अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत असताना दिसत आहे. ठाकरेंचे 11 पैकी 02 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. आणि उरलेले 02 नगरसेवक मनसेच्या संपर्कात असल्याचं समजतंय.
यावर भाष्य करीत शिवसेनेचे नेते संजय शिरसाट म्हणाले, कोण कोणाच्या संपर्कात आहे, याचं कोडं आत्ता सांगणं कठीण आहे. परंतु KDMC मध्ये महायुतीची सत्ता नक्की येईल, आणि शिवसेनेचा महापौर नक्की बसेल असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.

Published on: Jan 21, 2026 05:57 PM