Mayuri Jagtap : माझ्या पतीची यात काहीही चूक नाही; हगवणे पितापुत्राच्या अटकेवर मयूरी जगताप यांची प्रतिक्रिया

Mayuri Jagtap : माझ्या पतीची यात काहीही चूक नाही; हगवणे पितापुत्राच्या अटकेवर मयूरी जगताप यांची प्रतिक्रिया

| Updated on: May 23, 2025 | 4:20 PM

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात आज पोलिसांनी हगवणे पिता पुत्राला अटक केली आहे. त्यानंतर हगवणे यांच्या मोठ्या सुनेने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सुशील हगवणे याचा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात कोणताही सहभाग नव्हता असं मयूरी जगतापने म्हंटलं आहे. पती सुशील हगवणेच्या अटकेनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बोलण्यामुळे तपासाला वेग आला असल्याचंही यावेळी मयूरी जगताप यांनी म्हंटलं आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात वैष्णवीच्या सासरच्या मंडळींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केला आहे. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडलेली असतानाच हगवणे कुटुंबातल्या मोठ्या सुनेने देखील काल तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली होती. मात्र माझ्या पतीचा मला आधार होता असंही त्यांनी म्हंटलं होतं. आज पोलिसांनी वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. त्यानंतर मयूरी जगतापने प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण प्रकारात माझ्या पतीची काहीही चूक नसल्याचं मयूरी यांनी म्हंटलं आहे. तसंच मी जरी सासरी असते तर माझंही नाव यात आलं असतं, असंही यावेळी मयूरी जगताप यांनी म्हंटलं आहे.

Published on: May 23, 2025 04:20 PM