Sachin Kharat : मेधा कुलकर्णींनी रुग्णालयाला दिलेली क्लीनचीट म्हणजे नवी पेशवाई; सचिन खरात यांची टीका

Sachin Kharat : मेधा कुलकर्णींनी रुग्णालयाला दिलेली क्लीनचीट म्हणजे नवी पेशवाई; सचिन खरात यांची टीका

| Updated on: Apr 08, 2025 | 9:09 AM

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी रुग्णालयाला क्लीनचीट दिली आहे. त्यावर सचिन खरात यांनी टीका केली आहे.

मेधा कुलकर्णी यांनी रुग्णालयाला क्लीनचीट दिली ही नवी पेशवाई आहे, अशी टीका सचिन खरात यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर केली आहे. गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला क्लीनचीट दिली आहे. नेमलेल्या समितीचा अहवाल येण्याआधीच त्यांनी ही क्लीनचीट दिल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. आरपीआयचे सचिन खरात यांनी देखील मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका केली आहे. बहुजन समाजाने एकत्र येऊन ही नवीन पेशवाई आपण ओळखायला हवी, असं खरात यांनी म्हंटलं आहे.

Published on: Apr 08, 2025 09:09 AM