tv9 Marathi Special Report | मुंब्रा हिरवा करू… वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी

tv9 Marathi Special Report | मुंब्रा हिरवा करू… वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी

| Updated on: Jan 26, 2026 | 11:38 AM

मुंब्रामधील MIM नगरसेविका सहर शेखच्या वक्तव्यावरून सुरु झालेला वाद आणखी वाढला आहे. MIM नेते इम्तियाज जलील यांनी मुंब्रातील या वादाला पुन्हा फोडणी दिली आहे. फक्त मुंब्राच न्हवे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू, असं जलील म्हणाले. जलील यांनी भाजपच्या किरीट सोमय्या, नितेश राणे आणि नवनीत राणा यांना आव्हानही दिलं आहे.

मुंब्रामधील MIM नगरसेविका सहर शेखच्या वक्तव्यावरून सुरु झालेला वाद आणखी वाढला आहे. MIM नेते इम्तियाज जलील यांनी मुंब्रातील या वादाला पुन्हा फोडणी दिली आहे. फक्त मुंब्राच न्हवे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू, असं जलील म्हणाले. जलील यांनी भाजपच्या किरीट सोमय्या, नितेश राणे आणि नवनीत राणा यांना आव्हानही दिलं आहे. सहर शेखने कैसा हराया? आणि संपूर्ण मुंब्रा हिरवा करू, असं विधान करून विरोधकांना डिवचलं होतं. याच वक्तव्यावरून वाद सुरु झाला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तर थेट मुंब्रा गाठून एमआयएमला आव्हानही दिलं होतं. त्यानंतर सेहेरने माफीही मागितली होती. मात्र, इम्तियाज जलील यांनी पुन्हा सेहेर शेखला तेच वक्तव्य करण्यास भाग पाडलं आहे. इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा दाखला दिला होता. पूर्ण ठाणे भगवं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. ते चालतं तर मग मुंब्रा हिरवा आहे असं म्हणण्याला आक्षेप का? असा सवाल करत आम्ही मुंब्रा हिरवा करू, असं आता मीच म्हणतोय. माझ्याविरोधात काय करायचं ते करा, असं आव्हानच जलील यांनी भाजप नेत्यांना दिल्याने या वादाला अधिकच फोडणी मिळाली आहे.

Published on: Jan 26, 2026 11:38 AM