कोणताच कट्टरतावाज आम्हाला मान्य नाही
आम्ही सर्वधर्म समभाव मानतो, तेच तत्वज्ञान घेऊन आम्ही पुढं जात आहोत त्यामुळे कोणत्याही धर्माचा, पक्षाचा कट्टरतवाद आम्हाला मान्य नाही असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडले.
महाविकास आघाडीला MIM पक्षाचा प्रस्ताव आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. एमआयएम पक्षाच्या प्रस्तावानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलताना सांगितले की, आम्ही सर्वधर्म समभाव मानतो, तेच तत्वज्ञान घेऊन आम्ही पुढं जात आहोत त्यामुळे कोणत्याही धर्माचा, पक्षाचा कट्टरतवाद आम्हाला मान्य नाही असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडले. एमआयएमच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीस, नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
