अजितदादांचा आदेश धनंजय मुंडेंनी धुडकावला, 6 आठवडे उलटले तरीही एकही जनता दरबार नाही, कारवाई होणार?

अजितदादांचा आदेश धनंजय मुंडेंनी धुडकावला, 6 आठवडे उलटले तरीही एकही जनता दरबार नाही, कारवाई होणार?

| Updated on: Feb 20, 2025 | 1:36 PM

अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना पक्षकार्यालयात जनता दरबार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अजित पवार यांनी सूचना दिल्यानंतरही मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून सहा आठवडे उलटून गेले तरीही एकही जनता दरबार घेण्यात आला नसल्याचं दिसतंय.

मुंबईतील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात एकदाही जनता दरबाराला मंत्री धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली नसल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना पक्षकार्यालयात जनता दरबार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अजित पवार यांनी सूचना दिल्यानंतरही मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून सहा आठवडे उलटून गेले तरीही एकही जनता दरबार घेण्यात आला नसल्याचं दिसतंय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मुंबईतील एकाही जनता दरबाराला मंत्री धनंजय मुंडे यांची गैरहजेरी पाहायला मिळाली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात अजित पवार कोणती कारवाई करणार का? असा सवाल केला जात आहे. गेल्या सात जानेवारीपासून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आपापल्या पक्ष कार्यालयात जनता दरबार घेण्याच्या सूचना अजित पवार यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. अजित पवार यांचा आदेश असतानाही मंत्री धनंजय मुंडे गेल्या सहा आठवड्यांपासून एकाही जनता दरबाराला हजर राहिलेले नाही. त्यामुळे धनंजय मुंडे आपल्या पक्षाच्या अध्यक्षांच्याच आदेशाचं पालन करता की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. धनंजय मुंडे हे स्वतःच्या बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवत असतात. मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबार घेण्याच्या सूचना प्रत्येक मंत्र्याला दिल्या असताना धनंजय मुंडे त्या आदेशाचं पालन करताना दिसत नाही.

Published on: Feb 20, 2025 01:36 PM