आम्ही कोणतेही कार्यालय ताब्यात घेणार नाही, त्यामुळे…, गुलाबराव पाटील यांनी स्पष्टच सांगितलं; बघा काय म्हणाले?

आम्ही कोणतेही कार्यालय ताब्यात घेणार नाही, त्यामुळे…, गुलाबराव पाटील यांनी स्पष्टच सांगितलं; बघा काय म्हणाले?

| Updated on: Feb 20, 2023 | 7:38 PM

VIDEO | मंत्री गुलाबराव पाटील यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणावर केलं भाष्य, म्हणाले बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेण्याचा प्रयत्न करणार

बुलढाणा : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवनेसा पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे यांची झाल्याचेच म्हटले जात आहे. शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्याचा उद्देश नाही, आम्ही कोणतेही कार्यालय ताब्यात घेणार नाही. त्यामुळे यामध्ये कोणीही राजकारण करू नये. ही शिवसेना बाळासाहेबांची आहे ती बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे स्पष्टपणे शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोग यांनी शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे आल्यावरही भाष्य केले आहे. धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी २००० कोटी रूपयांचा सौदा झाला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला असा प्रश्न त्यांना विचारण्यात आल्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊत यांना माझ्याकडे बोलण्यासाठी पाठवा, असा खोचक टोला लगावत त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Published on: Feb 20, 2023 07:38 PM