Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रूपये कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं स्पष्ट सांगितलं…

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रूपये कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं स्पष्ट सांगितलं…

| Updated on: May 02, 2025 | 2:09 PM

'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना २१०० रूपये देण्याचं वचन आम्ही जाहीरनाम्यात दिलं होतं. हे वचन आम्ही राज्यातील परिस्थिती योग्य झाल्यानंतर आम्ही ते वचन पूर्ण करू,' असं हसन मुश्रीफ म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी सुरू केली. हीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली. विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २३७ आमदार महायुतीचे निवडून आलेत. या विजयानंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या १५०० रूपयांऐवजी २१०० रूपये देणार असे आश्वासन लाडक्या बहिणींना जाहीरपणे दिलं. मात्र सरकार आल्यानंतरही लाडक्या बहिणींच्या हफ्त्यात काही वाढ करण्यात आली नसल्याचे कळतेय. अशातच लाडकी बहीण योजनेतील २१०० रुपयांबाबत महायुतीमधील एका बड्या मंत्र्यांनी एक मोठं वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. ‘निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून १५०० रूपये देण्यास सुरूवात केली. दसरा आणि दिवाळी सणानिमित्त ७५०० रूपये आई-मुलीला दिलेत.’, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं तर २१०० रूपये कधी मिळणार हे देखील त्यांनी सांगितले.

Published on: May 02, 2025 02:09 PM