जितेंद्र आव्हाड यांच्या लढ्याला यश, उदय सामंत यांनी विधिमंडळात केली ‘ही’ मोठी घोषणा

| Updated on: Mar 21, 2023 | 8:01 PM

VIDEO | जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकावणाऱ्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई; मंत्री उदय सामंत यांनी केली विधिमंडळात घोषणा

Follow us on

मुंबई : ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कुटुंबीयांना आहेर यांच्यापासून धोका असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी केलेल्या लढ्याला मोठं यश मिळाले आहे. ठाणे महापालिका आयुक्त महेश आहेर यांचा कार्यभार काढल्याची घोषणा आज मंत्री उदय समंत यांनी विधान परिषदेत केली. याप्रकरणी महेश आहेर यांची स्वतंत्र चौकशी करण्यात येत होती अखेर आहेर यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांचा कार्यभार काढून घेण्यात आल्याची घोषणा विधिमंडळात उदय सामंत यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी देण्याची महेश आहेर यांचे कथीच ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. याबाबत विधानसभेत आव्हाड यांनीही गंभीर आरोप केले होते. संबंधित अधिकाऱ्याच्या ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर त्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. या प्रकारणाची चौकशी तीस दिवसात पूर्ण करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे उदय सामंत यांनी म्हटले.