माझी हीच स्टाईल आहे.. कोणताही पश्चाताप नाही; संजय गायकवाड स्पष्टच बोलले

माझी हीच स्टाईल आहे.. कोणताही पश्चाताप नाही; संजय गायकवाड स्पष्टच बोलले

| Updated on: Jul 09, 2025 | 12:27 PM

आमदार संजय गायकवाड यांनी मारहाणीच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे..

निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याच्या रागातून शिंदे गटाचे बुलढण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतं आहे. त्यानंतर आता आमदार निवासातील कॅन्टिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी आज विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या आधी स्पष्टीकरण दिले आहे. ते विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मी आमदार असलो तरी मी माणूस आहे. माझी शिवसेनेची हीच स्टाईल आहे. आमदारांच्या जिवाशी खेळू नका. कॅन्टिन मालकाकडून अनेकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. तिथे मिळणाऱ्या निकृष्ट जेवणासंबंधी मी यापूर्वीही तक्रार केली होती. दिवसभरात 10 हजार जण या कॅन्टिनमध्ये जेवतात. रात्री समितीच्या चेअरमनलाही हे सांगितले होते. मी जे केले ते मला मान्य आहे. मला त्याचा कोणताही पश्चाताप नाही, असं आमदार गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

Published on: Jul 09, 2025 12:27 PM