VIDEO | ‘पवार यांच्या सारखं बदण्याचा तो प्रयत्न करतोय’; राऊत यांच्यावर शिवसेना नेत्याची खोचक टीका

VIDEO | ‘पवार यांच्या सारखं बदण्याचा तो प्रयत्न करतोय’; राऊत यांच्यावर शिवसेना नेत्याची खोचक टीका

| Updated on: Aug 26, 2023 | 3:53 PM

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार आणि शरद पवार गट. तरी देखील अध्यक्षा सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे राष्ट्रवादीत फुट पडलेली नाही असेच म्हणत आहेत. तर अजित पवार आणि त्यांच्या गटातील नेते देखील पक्ष एकसंघ असून कोणतीच फूट पडलेली नाही असे म्हणत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : 26 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने अख्या राज्यात खळबळ उडालेली आहे. त्यावरून आता टीका टिपण्णी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार यांच्यासह त्यांच्या गटातील नेते हे पक्षात कोणतीच फूट पडलेली नसल्याचे बोलत आहेत. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत देखील आता थेट टीका करताना दिसत आहेत. मात्र त्यांच्या वक्तव्यात तफावत होत असल्याने त्यांच्यावर शिंदे गटातील नेत्याचे झोंबणारी टीका केली आहे.

राऊत यांनी गेल्या काही दिवसात आधी वक्तव्य करत ती बदली आहेत. त्यावरून शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. त्यांनी राऊत यांनी आधी म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. पण आता ते आपल्याच वक्तव्यावरून फिरत आहेत. ज्याप्रमाणे शरद पवार हे त्यांचे स्टेटमेंट बदलतात. त्याचप्रमाणे आता राऊतही स्टेटमेंट बदलत आहेत. तर राऊत यांना माहित आहे की, आता महाविकास आघाडीच राहणार नाही. त्यातच फूट पडली आहे. त्यांची भूमिका ही गांडुळासारखी आहे.

Published on: Aug 26, 2023 03:52 PM