शिवाजी पार्क मैदानात महापालिकेविरोधात मनसेचे आंदोलन
शिवाजी पार्क मैदानात आज मनसेच्या वतीने महापालिकेच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मनसेच्या इतर नेत्यांची देखील उपस्थिती होती.
शिवाजी पार्क मैदानात आज मनसेच्या वतीने महापालिकेच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मनसेच्या इतर नेत्यांची देखील उपस्थिती होती. सध्या शिवाजी पार्क मैदानाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. मात्र यामध्ये खडीचा वापर होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. कामसाठी खडीचा वापर करण्यास मनसेकडून विरोध करण्यात आला होता. आता याचविरोधात मनसेने शिवाजी पार्कमध्ये आंदोलन सुरू केले आहे. मनसेच्या या आंदोलनाला स्थानिकांनी देखील पाठिंबा दिला आहे.
