Raj Thackeray : असं नियोजन करा की… राज ठाकरेंचे थेट ‘शिवतीर्थ’वरून आदेश, आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत…
राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील बैठकीत निवडणूक आयोगाविरोधात सत्यासाठी, सत्तेसाठी नाही असा न भूतो न भविष्यती मोर्चा काढण्याचे आवाहन केले. मनसे पदाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या आहेत की, या मोर्च्याची दखल गल्लीपासून दिल्लीपर्यंत घेतली जाईल, अशा पद्धतीने नियोजन करावे. या नियोजन प्रक्रियेत महाविकास आघाडीचे नेतेही सहभागी असतील.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाविरोधात सत्यासाठी भव्य मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. शिवतीर्थावर झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी हे विधान केले. “हा मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी आहे आणि खोट्या मतदारांसाठी नाही, तर खऱ्या मतदारांसाठी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांना न भूतो न भविष्यती असा मोर्चा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या मोर्च्याची दखल घेतली जाईल याची खात्री करण्यास सांगितले. आगामी चार-पाच दिवसांत या मोर्च्याचे नियोजन केले जाईल. या मोर्च्याच्या नियोजनात मनसेसोबतच महाविकास आघाडीचे नेतेही समन्वयाने काम करतील. निवडणूक आयोगाविरोधात विराट आंदोलन करण्यासाठी मनसेने सक्रिय भूमिका घेतली आहे.
Published on: Oct 25, 2025 05:53 PM
