Meera Bhyandar Morcha : अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष
Avinash Jadhav at Meera Bhyandar Morcha : पोलिसांनी नमती भूमिका घेत अखेर मनसे नेते अविनाश जाधव यांना सोडलं आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी पहाटे 3 वाजता ताब्यात घेतल्यानंतर मनसैनिक अधिकच आक्रमक झाले. मीरा – भाईंदर येथील मोर्चाआधीच केलेल्या या कारवाईने वातावरण चांगलंच तापलं होतं. सकाळपासून मोर्चाला परवानगी असल्याचं सांगत मीरा भाईंदर येथे पोलिसांकडून मोर्चेकऱ्यांची धरपकड केली जात होती. वाढता गदारोळ बघता अखेर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली. त्यानंतर या मोर्चाला सुरुवात झाली. मात्र जोवर अविनाश जाधव यांना सोडणार नाही तोवर मोर्चा सुरूच राहील अशी आक्रमक भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतल्याने पोलिसांना अखेर नमती भूमिका घ्यावी लागली व अविनाश जाधव यांना सोडावं लागलं. त्यानंतर पालघर येथील पोलिस ठाण्यातून अविनाश जाधव हे थेट मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाले. तत्पूर्वी संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, विनोद घोसळकर देखील मोर्चात दाखल झालेले होते. यावेळी अविनाश जाधव मोर्चात दाखल होताच कार्यकर्ते व मोर्चेकऱ्यांनी एकच जल्लोष केलेला दिसून आला.
