Avinash Jadhav Video : ‘गुणरत्न सदावर्ते हा फालतू, …तर याला टकलं करून फिरवणार’, मनसे नेत्याची जिव्हारी लागणारी टीका

Avinash Jadhav Video : ‘गुणरत्न सदावर्ते हा फालतू, …तर याला टकलं करून फिरवणार’, मनसे नेत्याची जिव्हारी लागणारी टीका

| Edited By: | Updated on: Mar 07, 2025 | 5:48 PM

मनसे नेते अविनाश जाधव यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली. इतकंच नाहीतर यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैय्याजी जोशी यांचं नाव न घेता चांगलंच फटकारलं

‘महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी भाषाच चालणार…त्यासाठी कोणी भैय्याजीने येऊन सांगायची गरज नाही. मुंबईची भाषा नेमकी कोणती?’, असं म्हणत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैय्याजी जोशी यांचं नाव न घेता चांगलंच फटकारलं आहे. पुढे ते असेही म्हणाले, महाराष्ट्राची आणि मुंबईची भाषा मराठीच आहे. त्याला कोणाच्या भैय्याजींच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. तर भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेसंदर्भात केलेले ते वक्तव्य का केलं? कोणत्या कारणामुळे केलं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ज्या माणसाने मराठी भाषेसंदर्भात एक वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलाय. जर भैय्याजी जोशी यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यासंदर्भात महाराष्ट्रातील जनतेशी माफी मागितली नाही तर महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, असं म्हणत अविनाश जाधव यांनी भैय्याजी जोशी यांना माफी मागण्याची विनंती केली. तर गुणरत्न सदावर्ते हा फालतू माणूस आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या विरोधात आहे. सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड काढला त्यावर यांना विरोध.. हिंमत आहे तर तिरूपतीला जा… असं आव्हानही अविनाश जाधव यांनी दिलं. सदावर्ते हा पग आहे. (कुत्र्याची एक जात) सेम तसाच दिसतो. त्याची बुद्धी ही त्याच्या केसात गुरफटली आहे. त्यामुळे त्याला झटके येतात. त्यामुळे तो कोणत्याही विषयावर बोलतो त्याला चप्पलेने मारलं पाहिजे. जर राजसाहेबांवर बोलला तर महाराष्ट्र सैनिक याला टकला करेन, अशी जिव्हारी लागणारी टीकाही अविनाश जाधव यांनी केली.

असं होतं भैय्याजीं जोशींचं वक्तव्य

“मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या परिसरात विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. तर गिरगावात हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणार्‍या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही.”

Published on: Mar 07, 2025 05:27 PM