युवराज कोणाचं अर्थचक्र फिरवतायेत? संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

युवराज कोणाचं अर्थचक्र फिरवतायेत? संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 11:17 AM

यंदाच्या जवळपास निम्याहून अधिक आयपीएल सामन्यांचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. मात्र आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या खेळांडूच्या वाहतुकीसाठी पराराज्यातील बसची व्यवस्था केल्याने मनसेने नाराजी व्यक्त केली आहे.

यंदाच्या जवळपास निम्याहून अधिक आयपीएल सामन्यांचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. मात्र आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या खेळांडूच्या वाहतुकीसाठी पराराज्यातील बसची व्यवस्था केल्याने मनसेने नाराजी व्यक्त केली आहे. काल मनसेच्या वाहतूक सेनेकडून काही बस फोडण्यात आल्या होत्या. आता याच मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. युवराज नेमकं कोणाचे अर्थचक्र फिरवत आहेत, महाराष्ट्राचे की स्व:ताचे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.