MNS : अविनाश जाधव पुढचा गृहमंत्री… मराठी मोर्चाची परवानगी नाकारली, मनसैनिकांच्या भावना नेमक्या काय?

MNS : अविनाश जाधव पुढचा गृहमंत्री… मराठी मोर्चाची परवानगी नाकारली, मनसैनिकांच्या भावना नेमक्या काय?

| Updated on: Jul 08, 2025 | 1:04 PM

मीरा-भाईंदरमध्ये सध्या परिस्थिती चांगलीच चिघळल्याचे पाहायला मिळत आहे. मोर्चाची परवागनी नाकारल्याने मनसैनिक चांगलेच आक्रमक झालेत. तर दुसरीकडे पोलिसांकडून कार्यकर्त्यांना धरपकड करताना दिसताय.

मीरा भाईंदरमध्ये मनसैनिकांनी एका अमराठी व्यापाऱ्याच्या कानशिलात लगावल्यानंतर व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. विशेष म्हणजे या व्यापाऱ्यांनी त्या मोर्चाची कोणतीही परवानगी घेतली नव्हती तरीही त्यांनी मोर्चा काढत मीरा भाईंदरमध्ये बंद पुकारला होता. दरम्यान, मनसेकडून आज या मोर्चाला उत्तर म्हणून मराठी मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र या मोर्चांची परवानगी पोलिसांकडून नाकारण्यात आली. यानंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर पोलिसांनी मनसे नेत्यांची मध्यरात्री धरपकड करून त्यांना ताब्यातही घेतलं. पोलिसांकडून करण्यात आलेल्या मनसैनिकांवरून कारवाईवर मनसे कार्यकर्ते आणि सामान्य लोक संतापले असून रस्त्यावर उतरले आहेत.  तर दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. या पोलिसांकडून मनसैनिकांसह आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अडवलं जात असल्याने ते चांगलेच आक्रमक झाले. बघा त्यांच्या भावना काय?

Published on: Jul 08, 2025 12:51 PM