Tapovan Tree Felling : तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, मनसे चित्रपट सेना आक्रमक

| Updated on: Dec 06, 2025 | 12:52 PM

नाशिकच्या तपोवनात वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात मनसे चित्रपट सेनेने आंदोलन केले. अमेय खोपकर यांच्यासह अनेक कलाकार यात सहभागी झाले. नाशिककर आणि पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे शासनाने माघार घेतली असली तरी, मनसेने एकाही झाडाला हात न लावण्याची मागणी केली आहे.

नाशिकच्या तपोवन येथील वनसंपदा वाचवण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. तपोवनातील वृक्षतोडीच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात मनसेच्या चित्रपट सेनेने तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासह अभिनेते संतोष जुवेकर आणि अनेक कलाकार सहभागी झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून तपोवनातील झाडे तोडण्याच्या निर्णयाला नाशिककर नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि विविध सामाजिक संस्था व संघटनांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. अनेक राजकीय पक्षही या वृक्षतोडीच्या विरोधात एकवटले होते. या जनरेट्यामुळे शासनाला आपली भूमिका बदलावी लागली.

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे टेंडर रद्द केले जाणार नाही, कोणतेही नवीन बांधकाम होणार नाही आणि कोणतीही झाडे तोडली जाणार नाहीत. केवळ काही झाडांना दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपित केले जाईल. या घोषणेमुळे शासन बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले.

Published on: Dec 06, 2025 12:52 PM