Raj Thackeray : सरकारला नक्की हवंय काय? आधी हिंदी अन् आता कबुतरं… कबुतरखान्याच्या वादावरून राज ठाकरेंचा संताप
जैन समाजानं कबुतरखान्याजवळ आंदोलन करताना चाकू सुऱ्या आणल्या असतील, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करायला हवी, असं मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
‘कबुतरांमुळे कोणकोणत्या प्रकारचे रोग होऊ शकतात, हे आतापर्यंत अनेक डॉक्टरांनी सांगितलेले आहे. त्यांना खायला घालू नये असं हायकोर्टाने सांगितल्यावरही जर त्यांना खायला घालत असतील तर त्यावर पोलिसांनी कारवाई करणं गरजेचे आहे. धर्म धर्म या नावाखाली जर तुम्ही त्यांना खायला घालत असाल तर मग ते चुकीचं आहे.’, स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. तर हायकोर्टाचा निर्णय जर असले कबुतरांना खायला घालू नका तरीही ते सुरू असेल तर मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायचं कशाला? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
पुढे राज ठाकरे असेही म्हणाले की, सरकारला नक्की हवंय काय, फक्त निवडणुकीसाठी सर्व समाजांमध्ये त्यांनी एक एक विषय सुरु केलेत. आधी हिंदी आणून पाहिलं, आता कबुतरं आणली आहेत. ज्यावेळी जैन समजाकडून आंदोलन झाले तेव्हा पोलिसांनी कारवाई करायला हवी होती. यात जे लोढा वैगरेसारखे जे माणसं मध्ये येतात. ते मंत्री आहेत, कोणत्याही समाजाचे मंत्री नाही. त्यांनी महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे, असं स्पष्टपणे राज ठाकरे म्हणाले.
