Raj Thackeray : …मी अडानी नाही, घरी आदानी येऊन गेले म्हणून पापं झाकायची का? राज ठाकरे यांचे थेट प्रत्युत्तर

Raj Thackeray : …मी अडानी नाही, घरी आदानी येऊन गेले म्हणून पापं झाकायची का? राज ठाकरे यांचे थेट प्रत्युत्तर

| Updated on: Jan 12, 2026 | 11:10 PM

एकनाथ शिंदे यांनी कोविड काळातील निविदा आणि रोमिल छेडा यांवरून ठाकरे बंधूंवर टीका केली. यावर राज ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्यासह अनेक उद्योजक घरी येऊन गेल्याबद्दल खुलासा केला. ते म्हणाले, "घरी येऊन गेले म्हणून त्यांची पापं झाकायची का?" राज ठाकरेंनी अदानींशी कोणतीही विशेष दोस्ती नसल्याचेही स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीसांनंतर एकनाथ शिंदे यांनीही ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. कोविड काळातील निविदांवरून शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. “मराठी मुलांनी यांच्यासाठी राडा करायचा आणि टेंडर घेणार रोमिल छेडा?” असा सवाल शिंदे यांनी विचारला. “जिथे टेंडर, तिथे सरेंडर ही यांची नीती आहे,” असेही त्यांनी म्हटले. या टीकेनंतर राज ठाकरे यांनी स्वतःवरील आरोपांना प्रत्युत्तर दिले. गौतम अदानींसोबतच्या जुन्या छायाचित्रांवरून सुरू झालेल्या चर्चेवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, “माझ्या घरी गौतम अदानी येऊन गेले एकदा, माझ्याकडे रतन टाटा, मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा आणि अनेक फिल्म कलाकारही येऊन गेलेत.” घरी आलेल्या व्यक्तींमुळे त्यांची “पापं झाकायची का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे छायाचित्र दोन-तीन वर्षांपूर्वीचे असल्याचेही त्यांनी सांगितले आणि अदानींशी आपली दोस्ती नसल्याचे स्पष्ट केले.

Published on: Jan 12, 2026 11:10 PM