Thackeray Brothers : …मग ही सुरूवात, ठाकरे बंधूंकडून विजयी मेळाव्याचं खुलं आमंत्रण, बघा कशी आहे पत्रिका?

Thackeray Brothers : …मग ही सुरूवात, ठाकरे बंधूंकडून विजयी मेळाव्याचं खुलं आमंत्रण, बघा कशी आहे पत्रिका?

| Updated on: Jul 02, 2025 | 11:45 AM

येत्या ५ जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याची अधिकृत निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. यामध्ये आपल्याला जाहीर खुलं आवाहन असल्याचे दोन्ही ठाकरे बंधूंकडून म्हटलं आहे.

५ जुलै रोजी होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावर सोबत एकत्रित उपस्थित असल्याचे पाहायला मिळणार आहे. मराठी भाषा या एकाच मुद्द्यावरून ठाकरे घराण्यातील राजकारणात दुरावलेले दोघं पुन्हा एकत्र आल्याचे दिसणार आहे. दरम्यान, ५ जुलै रोजी होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला मराठी माणसाने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा, असं आवाहन यापूर्वीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं होतं. मात्र आता जाहीरपणे खुलं आमंत्रण ठाकरे बंधूंकडून देण्यात आलं आहे. व्हायरल होणाऱ्या निमंत्रण पत्रिकेत महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलताना पहायचा आहे? मग ही सुरूवात असल्याचे म्हटलं आहे. यासह या पत्रिकेत मेळाव्याचं ठिकाण तारीख आणि वेळ देखील नमूद केला आहे.

Published on: Jul 02, 2025 11:39 AM