Nitesh Rane on MNS : एवढी XXX ताकद असेल तर गोल टोपीवाल्यांच्या कानाखाली… राणेंच्या ‘त्या’ चॅलेंजला मनसेचं उत्तर
मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोधपूर स्वीटच्या मालकाला मारहाण केली आणि त्या विरोधात व्यापाऱ्यांनी बंद पुकारत मोर्चा काढला. पण हा मोर्चा व्यापाऱ्यांचा नसून भाजपने काढला असा आरोप मनसेने केला आहे. त्यावर नितेश राणेंनी पलटवार करत उत्तर दिलंय तर पुन्हा मनसेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलंय.
एवढी ताकद असेल तर जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार भेंडी बाजारमध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत मारून दाखवा ना. ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात? असा सवाल करत भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक सवाल मनसेला केला. इतकंच नाहीतर हिंदू धर्मियांना मारहाण करणाऱ्यांमध्ये दम असेल तर त्यांनी मोहम्मद अली रोड आणि नळबाजारात जाऊन आपली ताकद दाखवावी. या परिसरातही मराठी भाषा ऐकायला येत नाही मारहाण फक्त हिंदू लोकांनाच करायची, असं नितेश राणे यांनी म्हणत मनसेवर टीका केली होती. दरम्यान, राणेंच्या या टीकेवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पलटवार केलाय. जेव्हा पोलीस माता भगिनीवर मुस्लमानांनी हात उचलला तेव्हा रझा आकादमीविरोधात मोर्चा काढलेला त्यावेळी भाजप का गप्प होतं? असा सवालच संदीप देशपांडे यांनी केला.
Published on: Jul 04, 2025 12:54 PM
