Modi Cabinet Reshuffle| केंद्रीय मंत्रिमंडळात राणे, कपिल पाटील, हिना गावितांतांना मंत्रीपदाची शक्यता

Modi Cabinet Reshuffle| केंद्रीय मंत्रिमंडळात राणे, कपिल पाटील, हिना गावितांतांना मंत्रीपदाची शक्यता

| Edited By: | Updated on: Jul 06, 2021 | 9:16 PM

बुधवारी (7 जून) संध्याकाळी साडे पाच वाजता मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं आता सूत्रांकडून कळतंय. या फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर 20 नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. मात्र, आता केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल पुढील 24 तासांच्या आत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी (7 जून) संध्याकाळी साडे पाच वाजता मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं आता सूत्रांकडून कळतंय. या फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर 20 नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे यांच नाव निश्चित मानलं जात आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर राणे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यानंतर राणे आणि नड्डा यांची भेट झाल्यानंतर राणेंच्या केंद्रीय मंत्रिपदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनाही केंद्रीय राज्यमंत्रीपदाची संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे दोन्ही खासदार सध्या दिल्लीत आहे. दरम्यान, राणे आणि पाटील यांना मंत्रिपदाबाबत विचारलं असता त्यांनी मौन बाळगल्याचं पाहायला मिळालं.

Published on: Jul 06, 2021 09:16 PM