Pahalgam Attack : अश्रूंचा बदला पाण्यानं… पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदी सरकारचा पाकवर ‘कायदेशीर स्ट्राईक’
पाकिस्तानातील गहू, तांदूळ, ऊस आणि कापूस ही पीके अवलंबून आहेत. कराची, लाहोर, फैसलाबाद आणि रावळपिंडीसारखी शहरे औद्योगिक वापरासाठी सिंधूच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पाकिस्तानच्या जलविद्युत निर्मितीपैकी 30 ते 40% प्रकल्प सिंधू पाणी करारावर अवलंबून आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक केला आहे. पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिजा मिळणार नाहीये. पुढच्या 48 तासामध्ये पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडावा लागणार आहे.
सिंधू पाणी करार नेमका काय आहे?
भारत आणि पाकिस्तानात 19 सप्टेंबर 1960 रोजी झालेला एक आंतरराष्ट्रीय करार आहे. करार सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी वाटपाबद्दलचा आहे.
करारानुसार वाटप कस होतं?
पूर्वेकडील नद्यांचा वापर भारत करेल. पश्चिमेकडील नद्यांचा वापर पाकिस्तानसाठी आहे. पूर्वेकडील नद्यांमध्ये रावी, बियास आणि सतलज पाणी भारत वापरणार. तर पश्चिमेकडील सिंधू, झेलम आणि चिनाब नदीचं पाणी प्रामुख्याने पाकिस्तान वापरेल. मात्र भारत पश्चिमेकडील नद्यांचेही पाणी शेती. जलविद्युत प्रकल्पांसाठी करणार आहे.
1960 पासून हा करार अद्याप एकदाही स्थगित व रद्द झाला नाही. 1965, 1971 आणि 1999 च्या युद्धा वेळी ही कराराची अंमलबजावणी झाली. पाकिस्तानच्या शेतीचा मोठा भाग सिंधू करारावर अवलंबून होता. पंजाब आणि सिंधू प्रांतातील शेतीसाठी हा करार संजीवनी ठरतो.
