PM Narendra Modi : दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; मन की बातमधून पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा

PM Narendra Modi : दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; मन की बातमधून पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा

| Updated on: Apr 27, 2025 | 5:17 PM

Modi Warns Pakistan In Mann Ki Baat : पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारताकडून पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावलं उचलली गेली आहेत. त्यानंतर आज मन की बात कार्यक्रमात मोदींनी पाकला थेट इशारा दिला आहे. 

दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ, असा इशारा मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांना न्याय देणार असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. दहशतवादी हल्ल्यातील दृश्य पाहून प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलं आहे, अशी मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितल. काश्मीर जळत राहावं असं दहशतवाद्यांच्या आकांना वाटतं, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी दहशतवाद्यांवर हल्लाबोल करताना त्यांना थेट इशारा दिला आहे. पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारताकडून पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावलं उचलली गेली आहेत. त्यानंतर आज मन की बात कार्यक्रमात मोदींनी पाकला थेट इशारा दिला आहे.

Published on: Apr 27, 2025 05:17 PM