Jalgaon Crime News : सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Jalgaon Crime News : सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

| Updated on: Mar 28, 2025 | 12:58 PM

Money Lender Harassment Case : खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून जळगाव येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे या सावकारावर कारवाई करण्याची मागणी कुटुंबाकडून केली जात आहे.

सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजची परतफेड करता येत नसल्याने आर्थिक विवंचनेतून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. कोरोना काळात या तरुणाने मुलीच्या वैद्यकीय खर्चासाठी खासगी सावकाराकडून पैसे घेतलेले होते. त्यानंतर त्यातील काही पैशांची त्याने परतफेड देखील केलेली होती. मात्र उर्वरित पैसे आणि त्यावरील व्याजासाठी सावकाराकडून तगादा लावला जात होता. त्यासाठी या तरुणाच्या घरी येऊन देखील त्यांनी त्याला धमकावले होते. मात्र सावकाराचा जाच वाढल्याने या तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे.

Published on: Mar 28, 2025 12:56 PM