भोंग्याच्या आंदोलनाची पुढची दिशा लवकरच ठरणार – मनसे
"भोंग्याच्या आंदोलनाची पुढची दिशा कशी असेल? याविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पत्र लवकरच येणार आहे" अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिली.
मुंबई: “भोंग्याच्या आंदोलनाची पुढची दिशा कशी असेल? याविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पत्र लवकरच येणार आहे” अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिली. “पक्षाची सभासद नोदंणी जून-जुलैपासून सुरु होईल. महाराष्ट्रात 12 कोटी जनता आहे. त्या सगळ्याकडे हे पत्र पाठवलं जाईल” असं त्यांनी सांगितलं. “भोंग्याचा विषय नेहमी घेतला गेला. पण हनुमान चालिसाचा पर्याय पहिल्यांदा देण्यात आला. त्यानंतर अनेक ठिकाणी सकाळची अजान बंद झाली. मौलवींनी पुढाकार घेऊन भोंगे उतरवलेत, त्यावर मर्यादा आली” असं गजानन काळे यांनी सांगितलं.
Published on: May 28, 2022 07:22 PM
