VIDEO : Aurangabad | औरंगाबादमध्ये ‘भारत बंद’च्या समर्थनार्थ आंदोलन, क्रांती चौकात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

| Updated on: Sep 27, 2021 | 1:19 PM

शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या 40 शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने लोकांना भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होत. औरंगाबादमध्ये 'भारत बंद'च्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. क्रांती चौकात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केली. 

Follow us on

देशातील विविध संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारने (पारीत केलेल्या नवीन तीन कृषी कायद्याच्या विरोधात लढा सुरू ठेवण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने सोमवारी ‘भारत बंद’ची (Bharat Bandh) घोषणा केली आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. तर शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या 40 शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने लोकांना भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होत. औरंगाबादमध्ये ‘भारत बंद’च्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. क्रांती चौकात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केली.