Sandipanrao Bhumre : 150 कोटींचं गिफ्ट अन् भूमरेंचा ड्रायव्हर अडचणीत

Sandipanrao Bhumre : 150 कोटींचं गिफ्ट अन् भूमरेंचा ड्रायव्हर अडचणीत

| Updated on: Jun 27, 2025 | 2:06 PM

Sandipanrao Bhumre News : शिंदेसेनेचे खासदार संदीपान भूमरे यांचा ड्रायव्हर 150 कोटींच्या गिफ्टमुळे अडचणीत आला आहे.

150 कोटींच्या जागेमुळे खासदार संदीपान भूमरेंचा ड्रायव्हर आता अडचणीत आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भूमरे यांच्या ड्रायव्हरला हैद्राबादच्या सालारजंग कुटुंबाकडून 150 कोटींची जमीन गिफ्ट मिळाली आहे. एवढ्या मोठ्या रकमेची जागा भूमरेंच्या ड्रायव्हरला गिफ्ट कशी मिळाली याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.

संदीपान भूमरेंच्या ड्रायव्हरची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या दाऊदपुरा परिसरातल्या 150 कोटींच्या 3 ऐकर जागेवरून ही चौकशी करण्यात येत आहे. ही जागा मूळ हैद्राबादच्या सालारजंग कुटुंबाची होती. सालारजंग कुटुंबं हे हैद्राबादच्या निजामाच्या सेवेत होतं. या कुटुंबाची 150 कोटींची जागा भूमरेंच्या ड्रायव्हरला गिफ्ट म्हणून देण्यात आली आहे. जावेद शेख असं या ड्रायव्हरचं नाव असून तो 12 ते 13 वर्षांपासून भूमरेंच्या सेवेत आहे. साधारण ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीला एवढ्या मोठ्या रकमेची जागा गिफ्ट कशी मिळाली असा संशय आता निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याची चौकशी करण्यात येत आहे.

Published on: Jun 27, 2025 02:06 PM