Sanjay Raut : निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतांचा टोला

Sanjay Raut : निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतांचा टोला

| Updated on: Mar 15, 2025 | 11:44 AM

Sanjay Raut On Ladki Bahin Yojana : खासदार संजय राऊत यांनी आज महायुती सरकारवर निशाणा साधत लाडकी बहीण योजना ही केवळ मत मिळवण्यासाठी लवलेलं दुकान होतं असं म्हंटलं आहे.

घरा घरात आक्रोश आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत आणि सरकार रंग उधळण्यात मग्न आहे. कोणत्याही गहन प्रश्नावर या सरकारने तोंड उघडलेलं नाही. हे ढोंगी आणि दुतोंडी सरकार आहे, अशी टीका उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राज्यात हाहाकार माजलेला असताना हे सरकार का चालवत आहेत? असा प्रश्न यावेळी राऊतांनी उपस्थित केला आहे.

लाडकी बहीण योजनेबद्दल सरकारने दिलेली आश्वासन आता पूर्ण केली नाही, तर ही योजना म्हणजे निवडणूक काळात सरकारने दिलेली लाच मानावी लागेल, असं राज ठाकरे यांनी म्हंटलं होतं. त्यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली. राज ठाकरे म्हणाले म्हणून ही लाच होते का? आम्ही त्याच्या आधीपासून याबद्दल आक्षेप घेत आहोत. ही योजना म्हणजे केवळ मत मिळवण्यासाठी लावलेलं 1500 रुपयांचं दुकान होतं. त्यावर कारवाईची मागणी देखील आम्ही सातत्याने करत आहोत, अशी टीका यावेळी राऊत यांनी केली. लाचखोरी झाली आहे. आता तुम्हाला गरज वाटत नसेल, म्हणून जाहीरनामा तयार करताना दिलेली आश्वासनं आता पूर्ण केली जात नाही आहेत, असंही राऊत म्हणाले.

Published on: Mar 15, 2025 11:44 AM