किंचित सेना ‘अंडरग्राउंड’, आमच्यात टाचणीभरही… बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे यांना नेमका टोला काय ?
उद्धव ठाकरे यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने दोन जागा जरी दिल्या तरी ते महाविकास आघाडी सोडणार नाहीत. पक्ष संपला तरी चालेल पण महाविकास आघाडीमध्ये राहणे ते पसंद करतील. ४० आमदार गेले. १२ खासदार गेले तरीही त्यांना काही वाटत नाही.
मुंबई : उद्धव ठाकरे यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने दोन जागा जरी दिल्या तरी ते महाविकास आघाडी सोडणार नाहीत. पक्ष संपला तरी चालेल पण महाविकास आघाडीमध्ये राहणे ते पसंद करतील. 40 आमदार गेले. 12 खासदार गेले तरीही त्यांना काही वाटत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना लोकसभेच्या 48 पैकी 2 जागा दिल्या तरी ते राहतील. काँग्रेस राष्ट्रवादी इतके बार्गेनिंग करतील की त्यांच्या किंचित सेनेला अंडरग्राउंड केल्याशिवाय काँग्रेस राष्ट्रवादी राहणार नाही, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. मात्र, आमच्यात शिवसेना भाजप युतीत सगळं काही सुरळीत सुरु आहे. सीट वाटपावरून आमच्यात टाचणीभरही नाराजी नाही असे ते म्हणालेत.
Published on: May 23, 2023 06:35 PM
