Ladki Bahin Yojana e-KYC : लाडक्या बहिणींनो e-KYC केलंय का? नाहीतर 1500 रूपये बंद! फक्त ‘या’ 5 स्टेप्स वापरा
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डिकर यांनी ही माहिती दिली असून, येत्या दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेच्या लाभार्थी महिलांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डिकर यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, येत्या दोन महिन्यांत सर्व लाभार्थी महिलांनी ई-केवायसी पूर्ण करावी लागेल. ही प्रक्रिया ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन पूर्ण करता येईल. या वेबसाइटवर ई-केवायसीसाठी आवश्यक असलेली माहिती आणि पद्धत स्पष्ट करण्यात आली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, या निर्णयाचा उद्देश योजनेचा लाभ अधिक पारदर्शी आणि प्रभावीपणे पोहोचवणे हा आहे. ई-केवायसीद्वारे लाभार्थ्यांच्या माहितीची अचूकता सुनिश्चित करणे आणि कोणताही गैरवापर टाळणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.
Published on: Sep 19, 2025 11:30 PM
