Vasai Heavy Rain : वसईतील जनजीवन विस्कळीत, पाण्यातून वाट काढत रेल्वे संथ गतीनं सुरू, बघा कशी परिस्थिती?

Vasai Heavy Rain : वसईतील जनजीवन विस्कळीत, पाण्यातून वाट काढत रेल्वे संथ गतीनं सुरू, बघा कशी परिस्थिती?

| Updated on: Aug 19, 2025 | 6:59 PM

वसई विरारमध्ये सकाळपासून पावसाचा हाहाःकार पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून दुपार नंतरही पावसाचा जोर कायम आहे.

मुंबई आणि उपनगरासह वसई, विरार या भागातही मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला. वसई विरार नालासोपाऱ्यात अक्षरशः आज जलक्रोप पाहायला मिळाला. गेल्या २४ तासात २०० मिमी पाऊस झाला. सतत पडणाऱ्या पावसामुळे वसई आणि विरार येथील लोकांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पावसाचं पाणी भरलं त्यामुळे अनेक नागरिक पाण्यात अडकून पडले. अडकलेल्या अनेक लोकांना पालिकेच्या माध्यमातून रेस्क्यू करण्यात येत आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त आणि वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांच्याकडून पूर्ण परिसराची पाहणी सुरू आहे. तर नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे अहवान ही करण्यात येत आहे. तर मुसळधार पावसाच्या फटका स्नेहा दुबे-पंडित यांच्या कार्यालयाला बसला असून कार्यालयाला पाण्याने वेढले आहे. तर लोकल सेवेला देखील पावसाचा फटका बसला असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

Published on: Aug 19, 2025 06:46 PM